
देशात कोरोनाचे संकट असून महागाई वाढत आहे. अशा वेळी एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यांना महागाई राष्ट्रीय संकट वाटत असेल त्यांनी खाणे, पिणे सोडून द्यावे त्यामुळे हे संकट कमी होईल असे विधान छत्तीसगडचे आमदार बृहमोहन अग्रवाल यांनी केले आहे.
बृजमोहन अग्रवाल छत्तीसगमध्ये आमदार असून डॉ. रमण सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. गुरूवारी महागाईवर मत व्यक्त करताना अग्रवाल म्हणाले की, ज्यांना ज्यांना महागाई एक राष्ट्रीय संकट वाटत असेल त्यांनी खाणे पिणे सोडून द्यावे. पेट्रोल डिझेल वापरू नये. ज्यांनी काँग्रेसला मत दिले आहे त्यांनी जरी हे काम केले तर महागाई आटोक्यात येईल असे अग्रवाल म्हणाले.




























































