भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि ओळखीतील मोहमंद अहमद (अंकल) यांच्या दबावापोटीच मी शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, अंकलने माझ्या नावाचा गैरवापर करून त्यांच्याकडे फ्लॅट आणि पैशांची मागणी केली. त्यामुळे आता मी हे सत्य बोलल्यामुळे माझ्या जीवाला चित्रा वाघ आणि भाजपकडून धोका असल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे.
शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांच्याविरूद्ध कथित बलात्कारप्रकरणी पीडितेने पुण्यात धक्कादायक खुलासा केला आहे. संबंधित गुन्हा दाखल करण्यासाठी मला जबरदस्ती करण्यात आली. माझ्यात आणि रघुनाथ कुचिक यांच्यात वाद होते. मला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करायचा नव्हता. मात्र, ओळखीतील मोहमंद अहमद (अंकल ) यांच्यावतीने भाजपच्या चित्रा वाघ यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचविले गेले. त्यानंतर त्यांनी षडयंत्र रचून माझ्यावर दबाव टाकून कुचिक यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी मला प्रवृत्त केले. त्याशिवाय माझ्या नावाखाली अंकलने कुचिक यांच्याकडे फ्लॅट आणि काही रक्कम मागितली. याची माहिती मिळताच मी हा खुलासा केला असल्याचे पीडितेने सांगितले.
चित्रा वाघ आणि भाजपकडून जीवाला धोका
कुचिक आणि माझ्यातील वाद पोलिसांपर्यंत घेउन जायचा नव्हता. मात्र, चित्रा वाघ आणि अवंâल यांच्याकडून माझ्यावर प्रचंड दबाब टाकण्यात आला. मला सुसाईट नोटही लिहण्यास भाग पाडले. माझ्या नावाचा वापर करून अंकलने कुचिक यांच्याकडे फ्लॅट आणि पैशांची मागणी केली. त्यामुळे याची माहिती मिळताच हे सत्य मी आज सांगितले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ आणि भापजकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे पीडितेने सांगितले.
ओळखीतील अंकल अन चित्रा वाघ
पीडितेच्या ओळखीतील अंकलने गैरफायदा घेतला. कथित अत्याचार प्रकरणात लाखो रूपये मिळविण्याच्या हेतूने प्लॅन रचला. त्यानंतर चित्रा वाघ यांच्यापर्यंत माहिती पोहोचवून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. म्हणूनच मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, अंकल आणि चित्रा वाघ यांच्या दबावापोटीच हे प्रकरण शिजल्याचा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे.
भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि ओळखीतील मोहमंद अहमद (अंकल) यांच्या दबावापोटीच मी शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, अंकलने माझ्या नावाचा गैरवापर करून त्यांच्याकडे फ्लॅट आणि पैशांची मागणी केली. त्यामुळे आता मी हे सत्य बोलल्यामुळे माझ्या जीवाला चित्रा वाघ आणि भाजपकडून धोका असल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे.
शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांच्याविरूद्ध कथित बलात्कारप्रकरणी पीडितेने पुण्यात धक्कादायक खुलासा केला आहे. संबंधित गुन्हा दाखल करण्यासाठी मला जबरदस्ती करण्यात आली. माझ्यात आणि रघुनाथ कुचिक यांच्यात वाद होते. मला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करायचा नव्हता. मात्र, ओळखीतील मोहमंद अहमद (अंकल ) यांच्यावतीने भाजपच्या चित्रा वाघ यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचविले गेले. त्यानंतर त्यांनी षडयंत्र रचून माझ्यावर दबाव टावूâन कुचिक यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी मला प्रवृत्त केले. त्याशिवाय माझ्या नावाखाली अंकलने कुचिक यांच्याकडे फ्लॅट आणि काही रक्कम मागितली. याची माहिती मिळताच मी हा खुलासा केला असल्याचे पीडितेने सांगितले.
चित्रा वाघ आणि भाजपकडून जीवाला धोका
कुचिक आणि माझ्यातील वाद पोलिसांपर्यंत घेउन जायचा नव्हता. मात्र, चित्रा वाघ आणि अवंâल यांच्याकडून माझ्यावर प्रचंड दबाब टाकण्यात आला. मला सुसाईट नोटही लिहण्यास भाग पाडले. माझ्या नावाचा वापर करून अंकलने कुचिक यांच्याकडे फ्लॅट आणि पैशांची मागणी केली. त्यामुळे याची माहिती मिळताच हे सत्य मी आज सांगितले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ आणि भापजकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे पीडितेने सांगितले.
ओळखीतील अंकल अन चित्रा वाघ
पीडितेच्या ओळखीतील अंकलने गैरफायदा घेतला. कथित अत्याचार प्रकरणात लाखो रूपये मिळविण्याच्या हेतूने प्लॅन रचला. त्यानंतर चित्रा वाघ यांच्यापर्यंत माहिती पोहोचवून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. म्हणूनच मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, अंकल आणि चित्रा वाघ यांच्या दबावापोटीच हे प्रकरण शिजल्याचा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे.
पीआर आणि भाजपचा आयटीसेल
कथित अत्याचार प्रकरणात संबंधित नेत्याची बदनामी करण्यासाठी पुण्यातील काही पीआर आणि भाजपचा आयटीr विभाग चित्रा वाघ यांच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर वाघ सातत्याने पत्रकार परिषद घेउन वेगवेगळे कुचिक यांच्यावर आरोप करीत होत्या. त्यासाठी माझ्यावरही दबावही टाकण्यात आला. संबंधित पीआर, चित्रा वाघ यांच्यासह त्यांच्यासोबत असलेला एक व्यक्ती आणि भाजपच्या आयटी सेलचा पीडितेने भांडाफोड केला.