भाजपची सातवी यादी, भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जपने रविवारी आपली सातवी यादी जाहीर केली. या यादीत छत्तीसगडमधील सहा आणि महाराष्ट्र, तेलंगणा, मेघालयातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने आतापर्यंत सात याद्या घोषित करून 304 उमेदवारांची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपने सहा उमेदवार घोषित करताना पाच विद्यमान खासदारांना डच्चू दिला आहे.