भाजपच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाकडे लोकांनी फिरवली पाठ, खुर्च्या रिकाम्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-bjp-program

सामना प्रतिनिधी । नगर

नगरमध्ये महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शहरात सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, रविवारी स्टेशन रोड परिसरात भाजपची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काहींचे पक्षप्रवेशही होणार होते. मात्र, भाजपच्या सभेकडे नगरकरांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

थाटामाटात सोहळा पार पाडण्यासाठी या सभेवेळी आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच राहिल्याने नगर शहरात याची जोरदार चर्चा रंगली आहे. खासदार दिलीप गांधी यांच्याकडेच महत्वाची जबाबदारी आहे. जिल्हाध्यक्षपदही त्यांच्याकडेच असल्याने त्यांनी सर्व ताकद लावली आहे. सभेची जबाबदारी त्यांचीच होती. मात्र, गर्दी जमविण्यात ते अपयशी ठरले, अशी चर्चा आज दिवसभर नगरमध्ये रंगली आहे.