आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेत महायुतीला फटका बसला म्हणून भाजपने बहुतांश विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे भाजपने कुठलाही धोका पत्करायचा नाही असे ठरवलेले दिसते. आज भाजपने विधानसभा निवडणुकीची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 उमेदवार जाहीर केले असून बहुतांश उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. 99 उमेदवारांच्या यादीत 89 उमेदवारांन पुन्हा संधी दिली आहे. तर उर्वरित दहा ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.