भाजपने मित्र असलेल्या साई पक्षाला गिळले, उल्हासनगरात महापौरपदासाठी कायपण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तेसाठी स्थानिक मित्र पक्षाची साथ घ्यायची आणि हळूहळू तो पक्षच संपवायचा ही भाजपची कूटनीती उल्हासनगर महापौर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. उल्हासनगर महापालिकेची सत्ता हातची निसटू नये यासाठी भाजपने महापौरपदाचे गाजर दाखवून मित्रपक्ष असलेला अख्खा साई पक्षच गिळला आहे. साईचे सर्वच्या सर्व 11 नगरसेवकांना फोडून विलीनीकरणाच्या नावाने भाजपने त्यांना आपल्या दावणीला बांधले आहे. आम्ही पक्ष विलीन केला नाही असे साई पक्ष छातीठोकपणे सांगत असला तरी केवळ पालिकेपुरत्याच मर्यादित असलेल्या या पक्षाचे अस्थित्व आता संपल्यातच जमा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पप्पू कलानींपासून किभक्त झालेल्या एका गटाने साई पक्षाची निर्मिती करून 2007, 2012, 2017 साली सलग उल्हासनगर महापालिकेत सत्तेचा काटा घेतला. सन 2007 आणि 2012 मध्ये साई पक्ष शिकसेनेसोबत असताना त्यांनी महापौर, स्थायी समिती सभापती पदाचा मान मिळाला होता. मात्र 2017 च्या पालिका निकडणुकीनंतर साई पक्षाने भाजपसोबत युती केली. टिम ओमी कलानीला सोबत घेऊनही भाजपला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठता आली नव्हती. त्यामुळे दुसऱया टप्प्यात महापौरपद देण्याचे आश्वासन देत साई पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळवला. मात्र दुसऱया टप्प्यातील महापौरपदाची माळ साई पक्षाच्या गळ्यात घालण्याची वेळ आली तेव्हा भाजपने पलटी मारून विश्वासघात केला. त्यामुळे साई पक्षाने बंडाचे दंड थोपटून महापौरपदाचा उमेदवार उभा केला. हे बंड क्षमवण्यासाठी भाजपने साई पक्षाच्या उमेदवाराला महापौरपद देण्यास अखेर संमती दर्शवली. सुरुवातीला भाजपने दोन पावले मागे घतली असे वाटत होते. मात्र येथेही खेळी करत भाजपने साईपक्षातील सर्व 11 नगरसेवकच  फोडून आपल्या पक्षात विलीन करून घेतले. तशी अटच स्थानिक नेत्यांनी साई पक्षाला घातल्याचे आता उघडकीस आले आहे.

मित्रपक्षाचा बळी फळणार की उलटणार, आज फैसला

उल्हासनगर महापालिकेची सत्तासमीकरणे बदलणारी महापौर निवडणूक उद्या शुक्रवारी होणार आहे. कोण होणार महापौर याची उत्कंठा वाढली आहे. संख्याबळानुसार सत्तास्थापनेसाठी 40 नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपमधून टिम ओमी कलानी वेगळी झाली असल्याने संख्याबळ 19वर आले आहे. साईपक्षाची मदत घेतली तर 30 नगरसेवकांचा पल्ला जेमतेम गाठता येत आहे.  तर दुसरीकडे शिवसेना 25, राष्ट्रवादीचे 4 , आरपीआयचे 3, काँग्रेस, पीआरपी, भारिपचे प्रत्येकी एक असे पालिकेत सर्व पक्षांचे संख्याबळ आहे. भाजपचे उमेदवार सामनादास पुरस्वानी यांनी माघार घेतल्याने आता कमळाच्या चिन्हावर साईपक्षाचे जीवन इदनानी महापौर निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेने लीलाबाई आशान यांचे आव्हान आहे. त्यामुळे साईपक्षाचा बळी भाजपला फळणार की उलटणार याचा फैसला उद्या होईल.