भाजीवाल्याकडून खंडणी उकळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा जामीन फेटाळला

3910

कोरोना महामारीविरोधात सर्वजण रात्रीचा दिवस करून झटत असताना भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी प्रशांत माळी कल्याणमधील भाजी विक्रेत्यांकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाल्यानंतर केडीएमसीने माळी विरोधात पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केला. यामुळे अटक टाळण्यासाठी पंधरा दिवसांपासून माळी फरार आहे. कल्याण जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिस त्याला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात.

कल्याणच्या फडके मैदान प्रशांत माळी आणि किशोर पटेल हे वाहनधारक भाजीविक्रेते यांच्याकडून पाचशेपासून अडीच हजार रुपयांपर्यंत बळजबरीने खंडणी उकळत होते. याबाबतची तक्रार आल्यानंतर पालिकेने 22 एप्रिल रोजी माळी आणि पटेल यांना दिलेns स्वयंसेवक कार्ड काढून घेतले आणि त्यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला तर पालिका कर्मचारी किशोर घोटाळे मोहन केणे यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली. गुन्हा दाखल झाल्यापासून माळी फरार झाला. अंतरिम जामीन यासाठी त्यांनी कल्याण न्यायालयात अर्ज केला मात्र सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.

आपली प्रतिक्रिया द्या