
मुंबई शहरवासीयांची लाइफलाईन असलेल्या लोकलमध्ये प्रवाशांमधील वादाचा आलेख वाढत चालला आहे. महिला प्रवाशांना मारहाण करणे, विनयभंगाच्या घटना, प्रवाशांना मारहाण करणे आणि वादातून प्रवाशांना लोकलमधून ढकलून देणे अशा घटना वाढतच चालल्या आहेत.
लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये वाद होतात. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत होते. तसेच गर्दीचा फायदा घेऊन विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे रेल्वे प्रशासन आणि रेल्वे लोहमार्ग पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागते. लोकल आणि एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लूटमार करणे, तर धावत्या एक्सप्रेस आणि लोकलमधून प्रवाशाचे साहित्य चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. 2025 मध्ये एका डॉक्टर जोडपे एक्सप्रेसने प्रवास करत होते. चोरटय़ाने डॉक्टरची बॅग खेचून पळ काढला. त्या चोरटय़ाचा पाठलाग करत असताना एक्सप्रेसखाली आल्याने एका डॉक्टरला हात गमवावा लागला होता.
जुलै 2026 मध्ये कल्याण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमध्ये महिलेने दुसऱया महिलेवर पेपर स्प्रे मारला होता.
नुकतेच मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी महिलांच्या डब्यात शिरून महिलांचे एआयच्या माध्यमातून अश्लील पह्टो बनवणाऱयाला अटक केली होती.
जून 2026 मध्ये अंधेरीहून नालासोपारा येथे जाणाऱया लोकलमध्ये दरवाजावर उभे राहण्यावरून मयांक लोहार या युवकाची हत्या झाली होती.
नोव्हेंबर 2026 मध्ये चर्चगेट-विरार लोकलमध्ये ग्रॅण्टरोड स्थानकादरम्यान प्रवाशांमध्ये वाद झाला. झटापटीत तोल जाऊन एक प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडला होता.
ऑगस्ट 2026 मध्ये एका दिव्यांग प्रवाशाला वांद्रे आणि माहीमदरम्यान लोकलमधून खाली ढकलून दिले होते.

























































