भाजपला सोडचिठ्ठी, अद्वय हिरे शिवसेनेत प्रवेश करणार

नाशिक जिह्यातील भाजपा नेते अद्वय प्रशांत हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून, लवकरच ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार आहेत.

भाजपा नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. आज रविवारी मालेगाव व नाशिक जिह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली व भाजप सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच प्रवेशाची तारीख कळविणार असून, त्या दिवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती अद्वय हिरे यांनी दिली.