भाजपच्या झेडपी सदस्याचा भाऊही अटकेत, कशी मागितली लाच वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम याला दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री मोहिनी गेडाम या सिंदेवाही नगरपंचायतच्या भाजपच्या नगराध्यक्षा आहेत. गेडाम याचा लहान भाऊ हितेंद्र गेडाम याला लाचेचे पैसे स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

ब्रेकिंग : भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला 2 लाखांची लाच घेताना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, 2003 पासून रेती ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्याकडे नागराज गेडाम दोन महिन्यांपासून दोन लाखांची खंडणी मागत होते.तसेच रेती उत्खनन आणि रेती वाहतुकीत ते अडथळे आणत होते. आपल्याला 2 लाख रुपये दिले नाही तर रेतीघाट आणि व्यवसाय चालू देणार नाही अशी धमकीही गेडाम यांनी व्यावसायिकाला दिली होती. व्यावसायिकाने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. विभागाने तक्रारीची शहानिशा केली. त्यात तथ्य आढळल्याने सिंदेवाही येथे बुधवारी सापळा रचण्यात आला. गेडाम याने त्याचा लहान भाऊ हितेंद्र गेडामला पैसे घेण्यासाठी पाठवले होते. लाचेचे पैसे स्वीकारत असतानात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हितेंद्र गेडामला रंगेहात पकडले. चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.