
सामना ऑनलाईन । मिरत
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला भाजपचे उत्तर प्रदेशातील राज्य चिटणीस सुनील बन्सल यांनी पुष्पमाला अर्पण केल्यानंतर त्या पुतळय़ाचे शुक्रवारी दुग्धाभिषेक आणि गंगाजलाने शुद्धीकरण करण्यात आले. मिरतमधील वकिलांच्या एका चमूने हे शुद्धीकरण घडवले. जिल्हा न्यायालयानजीकच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा असून तिथे हा प्रकार घडला. एकीकडे भाजपच्या राजवटीत दलितांवर अत्याचार आणि हिंसक हल्ले सुरू आहेत. त्यांना दलितांशी, डॉ. आंबेडकर यांच्याशी कसलेही देणेघेणे नाही, असा आरोप पुतळय़ाचे शुद्धीकरण करणाऱ्या वकिलांनी केला.





























































