
बाजार समितीच्या निवडणुकीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. आमदार शिंदे यांनी आज पुन्हा विखे यांच्यावर आगपाखड केली आहे. ‘विधानसभेला विखेंचा अनुभव आला आहे. आता दररोज येतो आहे आणि बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्यक्ष पाहिला. बाहेरून आलेल्यांना भाजपच्या विचाराशी अनुरूप व्हायला वेळ लागतो,’ असे सांगत राम शिंदे यांनी विखे यांना टोला लगावला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार शिंदे यांनी विखेंविरोधात पक्षश्रेष्ठाRकडे तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाविरोधात काम केले आहे, असा शिंदेंचा आरोप आहे. मात्र, शिंदेंच्या आरोपात तथ्य नाही. त्यांचा गैरसमज झाला आहे, असे सांगत राधाकृष्ण विखे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आमदार शिंदे यांचा राग मावळायला तयार नाही.
‘पक्षात मला कोणी एकटे पाडायचा प्रयत्न केला तरी मी भाजपच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कितीही एकटं पाडलं तरी संघर्षातून पुढं जाईल,’ असा टोला राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांना लगावला आहे. आमच्यात बाजार समितीचा वाद आहे. फॉर्म भरल्यापासून विखे विरोधाची भूमिका घेत होते. त्यांचा पीए आमच्या विरोधात उभा राहिला, उपसभापती झाला. मी खासदार आणि पालकमंत्री यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे; पण त्यांनी योग्य दखल घेतली नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केला.
View this post on Instagram
मी यापूर्वी जे आरोप केले होते, ते कायम आहेत. विधानसभेला मला विखे यांचा अनुभव आला आहे. आता दररोजच येतो आहे. बाजार समिती निवडणुकीत प्रत्यक्षात पाहिला, असे सांगत राम शिंदे म्हणाले, ‘‘राधाकृष्ण विखे यांना भाजपमध्ये एकरूप व्हायला वेळ लागेल, असे वाटतेय. भाजपात तत्त्वांशी तडजोड होत नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना भाजपच्या विचारधारेशी अनुरूप व्हायला वेळ लागतो,’’ असा घणाघात राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर केला.
गैरसमज झाला की माणूस रागातून बोलतो – बावनकुळे
आमदार राम शिंदे आणि पालकमंत्री विखे यांच्या वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. हा विषय स्थानिक पातळीवरील आहे, त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. गैरसमज झाला की माणूस रागातून बोलतो. विखे यांनी त्यावर उत्तर देऊन विषय संपवला आहे. चर्चा करून मीही सोडविला आहे, असे बावनकुळे म्हणाले.
विधानसभेला विखेंचा अनुभव आला आहे. आता दररोज येतो आहे आणि बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्यक्ष पाहिला. राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये एकरूप आणि अनुरूप व्हायला वेळ लागेल असे वाटते. बाहेरून आलेल्या लोकांना भाजपच्या विचाराशी अनुरूप व्हायला वेळ लागतो.
– आमदार राम शिंदे
View this post on Instagram



























































