विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप नेत्यासह बायकोवर झाडल्या गोळ्या

1301

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.  त्या पार्श्वभुमीवर एका भाजप नेत्यासह पत्नीवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शीतल मुंडा हे भाजपचे नेते आहेत. ते माजी सरपंच राहिलेले आहेत. मुंडा भाजपचे बुथ प्रमुख होते. शुक्रवारी शीतल मुंडा आणि त्यांची पत्नी माडे हसा यांची मुलांसमोरच अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या. त्यात पत्नी माडे हसा यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार महिन्यातील ही दुसरी घटना आहे. हा भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. यापूर्वी माओवाद्यांनी भाजप नेते माघो मुंडू त्यांची बायको आणि मुलाचा खून केला होता.

शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. शेजारच्यांनी शनिवारी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. भाजप नेते शीतल  मुंडा यांना इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या