गद्दारांचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला स्मशानात जाळून टाका! : सुरेश धस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

राष्ट्रवादी हा गद्दाराचा पक्ष आहे जर गद्दाराची पक्षातून हकालपट्टी करायची ठरवली तर राष्ट्रवादी मध्ये शिल्लक कोणीच राहणार नाही. प्रकाश सोळुंके हे सुद्धा गद्दारच आहेत. नाते संबंधामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले. आज सुसज्ज स्मशान भूमीचे उद्घाटन होत आहे. या स्मशान भूमीत विरोधकांना म्हणजे राष्ट्रवादीला जाळून टाका असे आवाहन टोला भाजपा आमदार सुरेश धस यांनी लगावला

बीड जिल्ह्यातील वडवणी येथे विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार सुरेश धस बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे सह भाजपाचे जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले, वडवणीमध्ये सुसज्ज वैकुंठ धाम बांधले आहे. याचे उद्घाटन करण्याची गरज नाही, विरोधकांना या स्मशान भूमीत जाळून टाका असे वक्तव्य करत सुरेश धस यांनी केले. तसेच ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी गद्दाराचा पक्ष आहे, या पक्षातून गद्दारांना हाकलून दिले तर शिल्लक कोणीच राहणार नाही. प्रकाश सोळुंकेही एक गद्दारच आहेत. नातेसबंध आणि पाहुण्यांचे राजकारण यामुळे तर त्यांना मंत्रीपद मिळाले होते. सोळुंके आणि पंडित यांनी उसामध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले. जास्तीचा ऊस भरला तर सोळुंके म्हणतात वैष्णवी देवीला आणि पंडित म्हणतात जयभवानीला असे लुटणाचे काम या दोघांचे सुरू आहे. या भाषेत त्यांनी टीका केली कालच परळीमध्ये आमदार परिचारिकाची भाषा वापरत बिहारी नागरिकांवर टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.