
राज्यातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात भाकरी फिरवत संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नव्या टीममध्ये 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीसांसह 43 जणांचा कार्यकारिणीत समावेश केला आहे.
भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये आतापर्यंत पक्ष प्रवत्तेपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या केशव उपाध्ये यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, सुजय विखे, भारती पवार, अतुल काळसेकर, रामदास तडस, प्रवीण पोटे, संजय भेंड, संजय कोळगे, अर्चना पाटील चापुरकर, चैतन्यबापू देशमुख आणि प्रिया शिंदे अशा 12 जणांवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘युवा मोर्चा’च्या प्रदेशाध्यक्षपदी पृष्णराज महाडिक यांची तर कोषाध्यक्षपदी आमदार मिहीर कोटेचा यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपचे संयमी चेहरा असलेले केशव उपाध्ये हे गेल्या 8 वर्षांपासून मुख्य प्रवत्ते म्हणून भाजपची बाजू मांडताना दिसत होते. त्यांच्या जागी नवख्या नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्ये यांना उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली असली तरी मुख्य प्रवत्तेपदावरून दूर करत त्यांना साइडलाइन करण्यात आल्याची चर्चा आहे.
BJP Maharashtra Announces New Executive Committee with 43 Members
BJP State President Ravindra Chavan announces a fresh team for Maharashtra, including 12 Vice Presidents and 6 General Secretaries, ahead of upcoming local polls.































































