मित्र पक्षानं दिलेली वचनं पूर्ण करण्यास आम्ही बांधिल नाही, भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा खुलासा

4286

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात दिलेली वचनं सत्तेत आलेले पक्ष पूर्ण करणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यावेळी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नवा खुलासा केला आहे. मित्रपक्षांनी निवडणुकीत दिलेली वचनं पूर्ण करण्यास भाजप बांधिल नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘जेजेपी व भाजपची निवडणुकीनंतर युती झाली आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीआधी जी वचनं दिली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधिल नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे वचन दिले होते. मात्र आमची तशी कोणतीही योजना नाही. सप्टेंबर महिन्यातच आम्ही शेतकऱ्यांनी सहकारी बँकांमधून घेतलेल्या कर्जावरील व्याज आणि त्यांना लागलेल्या दंडाची रक्कम माफ केली आहे. तसेच जेजेपीच्या नोकऱ्यांच्या वचनाबाबतही आहे. त्यांनी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आऱक्षण देण्याचे वचन दिले होते. मात्र आम्ही त्याबाबत अद्याप विचार केलेला नाही’, असे खट्टर यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या