भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पिटाळले, भद्रावती येथील घटनेचा व्हीडिओ होतोय व्हायरल

गेल्या 15 वर्षात भद्रावती नगरपालिकेचे राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना जनतेने चांगलेच खडे बोल सुनावले. धानोरकर हे भद्रावती नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून, भाजपचे ते उमेदवार आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते सासरे आहेत. याच अनिल धानोरकरांना नागरिकांनी परत पाठवल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वार्डातील भौतिक समस्या, घरकुल योजना व दारू या विषयावर नागरिकांनी धानोरकर यांना जाब विचारला… प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने त्यांना काढता पाय घ्यावा लागला. निवडणूक रंगात आली असतानाच भाजप उमेदवाराला नागरिकांनी असे पिटाळून लावल्याने स्थानिक मुद्दे किती गंभीर स्वरूपाचे आहेत, हे दिसून आले.

नागरिकांनी उपस्थित केलेले विषय

– वार्डात येणार विकास निधी का थांबविला..
– घरकुल का रखडले…
– गेल्या 15 वर्षात रस्ते नाही, गट्टू नाही, नाल्या नाही… पावसाळ्याच्या दिवसात येवून बघा..
– लग्न करुन आली तेव्हा जसा वॉर्ड होता, तसाच आजही आहे… कोणत्याच सुधारणा नाही…
– दारूचे दुकान तुमचे, दारू तुम्हीच विकता आणि तोंडाचा वास आला म्हणून हाकलता…
– निवडणूक आली की सर्वच आश्वासन देतात… मग पाच वर्षे कुणी ढुंकून बघत नाही…
– नगरसेवकात काम करुन घ्यायचे दम नाही तर कशाला उभे राहता..
– जसे मालेगावला विषारी दारु पिल्याने घडले तशी घटना घडायला वेळ लागणार नाही…