हिजाब काढला तर एवढं काय, कुठे दुसरीकडे स्पर्श केला असता तर काय झालं असतं, भाजप मंत्र्याने तोडले अकलेचे तारे

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात एका महिला डॉक्टरचा हिजाब खाली खेचला. त्यांच्या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. एकीकडे नितीश यांनी माफी मागावी अशी मागणी होत असताना भाजपच्या उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी त्यांची पाठराखण करत अकलेचे तारे तोडले आहेत.

भाजपचे उत्तर प्रदेशमधील मंत्री संजय निषाद यांनी नितीश कुमारांची बाजू घेताना आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अरे ते पण माणूस आहेत. असं मागे लागणं योग्य नाही. फक्त हिजाब काढला तर इतकं काय, कुठे दुसरीकडे स्पर्श केला असता तर काय झालं असतं”, असं त्यांनी भारत समाचारशी बोलताना म्हटलं आहे. हे वक्तव्य केल्यानंतर निषाद हे हसत देखील होते.