…तर मुस्लिमांच्या मुली पळवून आणू, भाजप आमदाराचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

नेहमी वादग्रस्त विधानं करून खळबळ उडवून देणारे भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी बुधवारी लव्ह जिहादवरून वक्तव्य केलं आहे. ‘जर मुसलमानांनी लव्ह जिहाद करून हिंदू मुलींना पळवले तर आम्ही देखील त्यांच्या मुली पळवून आणू, तुम्ही दहा पळवल्या तर आम्ही वीस पळवून आणू’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप पुन्हा अडचणीत आली आहे.

‘गो-तस्कराच्या कानाखाली वाजवून झाडाला बांधा…’; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

‘प्रभू श्री राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते पण भगवान कृष्णांनी सर्व मर्यादा ओलांडत धर्मयुद्ध केले होते व धर्माची स्थापना केली होती. जरासंध व दुर्योधनाच्या वधासाठी आम्ही साम-दाम-दंड-भेद सगळ्याचाच वापर करू. ‘आमच्या ज्या मुली या लोकांनी लव्ह जिहादच्या नावाखाली पळवून नेल्या आहेत. त्यांना परत पाठवा. त्यासाठी मी तुम्हाला वेळही देतो. त्यांना परत आणा नाहीतर आमच्या दहा गेल्या असतील तर तुमच्या वीस पळवून आणू, वीस गेल्या तर चाळीस आणि चाळीस गेल्या तर ऐंशी पळून आणू. त्यानंतर तुमच्या मुली सुरक्षित नसतील’, असे वक्तव्य अहुजा यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी अहुजा यांनी गोतस्करांवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘एखादा गो-तस्कर हाती लागला तर त्याला कानाखाली वाजवा आणि झाडाला बांधा. त्यानंतर पोलिसांना बोलवा’, असं वादग्रस्त विधान केलं होतं.

summary : Ramgarh MLA Gyandev Ahuja threatenmed muslims girls