पुणे – महापौर, उपमहापौर यांच्यानंतर भाजप आमदार व त्यांच्या आईला कोरोनाची लागण

1567
कसबा पेठ-मुक्ता टिळक

पुण्यात कोरोना विषाणू चांगलाच फैलावत असून महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांच्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः मुक्ता टिळक यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात आमदार मुक्ता टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. यानंतर टिळक यांच्या घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी याचा अहवाल प्राप्त झाला असून मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, घरातील इतर सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची कोणतीही लक्षण दिसून आली नसल्याचे त्यांनी म्हटले असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर होम क्वारंटाईन करण्यात आले आहे व उपचार सुरू असल्याचे, त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या