
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. लाड यांची चौकशी केली जाणार आहे.
लाड यांची कंपनी असलेल्या क्रिस्टल आणि बीव्हीजीने महापालिकेत कंत्राट घेतले होते. बीव्हीजी आणि विमल अगरवाल यांच्यात वाद झाला होता. त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 2014 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2009 साली महापालिकेत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
वीस दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार प्रसाद लाड यांना नोटीस पाठवली आहे. नोटीशी नंतर लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. त्या कंपन्या संदर्भात झालेल्या एफआयआरमध्ये माझे नाव नसून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे लाड यांनी सांगितले. मी कोणाविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


































































