सपनाप्रमाणेच सोनिया गांधीही इटलीत नृत्याचे कार्यक्रम करायच्या, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

31

सामना ऑनलाईन । लखनौ

गायक व नृत्यांगना सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. सपनाच्या काँग्रेस प्रवेशावरून भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांनी सोनिया गांधींबाबत अत्यंत खालच्या दर्जाचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘सपनाप्रमाणेच सोनिया गांधी पण इटलीत नृत्यांचे कार्यक्रम करायच्या’,असे वक्तव्य सिंग यांनी केले आहे.

‘राहुल यांची आई इटलीत सपना जे काम करते तेच काम करायची. जसं तुमच्या वडीलांनी सोनियाजींना आपलं बनवलं तसं आता तुम्ही सपनाला तुमचे बनवा. यात सर्वात चांगली गोष्ट ही आहे की सासू आणि सून दोन्ही एकाच व्यवसायातून व संस्कृतीतने आल्या आहेत,’ असे वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केले.

दोन दिवसांपूर्वी या महाशयांनी मायावती वर देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘मायावती या 60 वर्षांच्या झाल्या आहेत पण दररोज फेशियल करून, केस काळे करून त्या तरुण राहायचा प्रयत्न करतात’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेले.

आपली प्रतिक्रिया द्या