
आई वडिलांनी मुलींवर चांगले संस्कार केले तर त्यांच्यावर बलात्कार होणार नाही असे अजब विधान भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. तसेच यात एकटं सरकार काही करू शकत नाही असेही सिंह म्हणाले आहेत.
हाथरस बलात्कार प्रकरणावरून संपूर्ण देश ढवळून निघत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. उत्तर प्रदेशच्या बैरिया मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक अजब आणि संतापजनक विधान केले आहे.
सिंह म्हणाले की, भलेही सरकार बलात्काराविरोधात तलवार घेऊन उभे राहील पण हे मुलीच्या आई वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी मुलींन चांगले संस्कार दिले पाहिजे. त्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. तरच बलात्कारासारख्या घटना थांबतील. सुरक्षा पुरवणं हे सरकारचे कर्तव्य आहे त्याच प्रमाणे आई वडिलांनीही आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे, त्यांना विनम्रता शिकवली पाहिजे. संस्कार आणि सरकार यांच्यामुळे देश सुंदर बनेल असेही सिंह म्हणाले.

























































