
भाजप नेते व खासदार अनुराग ठाकूर यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा लोकसभेतील एका चर्चेदरम्यानचा आहे. या व्हिडीओत ठाकूर यांनी घातलेल्या कंबरेच्या बेल्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लोकसभेत अमित शहा बोलत असताना विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर अनुराग ठाकूर शहांच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्याच काही सेकंदांचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अनुराग ठाकूर हे त्यांचा कंबरेचा बेल्ट लपवत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडे केला जात आहे.
अनुराग ठाकूर हे वापरत असलेला कंबरेचा बेल्ट हा लुईस वुईटन या कंपनीचा आहे. या बेल्टवर कंपनीचा LV monogram असा लोगो असून त्याची सध्याची किंमत ही 82 हजार ते एक लाख रुपयापर्यंत आहे. असा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे.




























































