
पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघाचे भाजपचे खासदार अर्जुन सिंग यांना पोलिसांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर लाठिचार्ज केला आहे. तसेच यावेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडीा देखील फोडली. रविवारी उत्तर 24 परगाणा जिल्ह्यात ही घटना घडली.
West Bengal: BJP MP Arjun Singh says,”I was attacked and my car has been vandalised. People were protesting peacefully. Police Commissioner Manoj Verma lathicharged on my head and abused me verbally. My residence is also being attacked.” pic.twitter.com/qucIY9Gd6Y
— ANI (@ANI) September 1, 2019
अर्जुन सिंह हे जिल्ह्यातील श्यामनगर भागातील फेडर रोड भाजप कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करत होते. त्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी अर्जुन सिंह यांची गाडी फोडली. ‘ या हाणामारीच्यावेळी पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी माझ्यावर लाठीचार्ज केल्याचा’, आरोप सिंह यांनी केला आहे.
दरम्यान अर्जुन सिंह यांनी पोलीस घटनास्थळी असून देखील त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना रोखले नसून भाजपच्या कार्यकर्त्यांवर व त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याचा आरोप केला आहे. तसेच ते तृणमूलचे कार्यकर्ते सिंग यांच्या घरात घुसून तोडफोड करण्याच्या प्रयत्नात होते असे देखील सिंग यांनी सांगितले.



























































