भाजप खासदार गौतम गंभीरकडून दिपीका पदुकोणचे समर्थन

1282

जेएनयु हिंसाचारानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. जेएनयु मध्ये डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनीही निदर्शने केली होती. त्यावेळी अभिनेत्री दिपीका पदुकोण हिने विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. अनेकांनी दिपीकाचा छपाक चित्रपटावर बहिष्कार घातला होता. त्यात भाजप कार्यकर्ते आणि नेते पुढे होते. परंतु माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी दिपीका पदुकोणला समर्थन दिले आहे.

एबीपी न्युजशी बोलताना गंभीर यांनी दिपीकाला पाठिंबा दर्शवला आहे. खासदार गंभीर म्हणाले की, “दिपीका पदुकोण जेएनयुमध्ये गेल्या ही चांगली गोष्ट आहे. लोकशाहीने तसा अधिकार त्यांना दिलाच आहे.” दिपीकाने निदर्शनाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली ही स्वागतार्ह बाब असल्याचे गंभीर यांनी सांगितले. परंतु त्याच दिवशी निर्भया बलात्कार आरोपींना फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले होते. दीपीका पदुकोण यांनी निर्भयाच्या पालकांची भेट घ्यायला हवी होती अस गंभीर म्हणाले. तसेच बेंगलुरू, बंगाल आणि केरळमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत तिथेही त्यांनी जावे असेही गंभीर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या