प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनच भाजप काम करेल – चंद्रकांत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस–काँग्रेस महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भाजप करणार नाही. प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनच भाजप काम करेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. निसर्गाचे संतुलन बिघडले तसे राजकारणाचेही संतुलन बिघडले आहे, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाही. मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्याबाबत आनंद आहे. मंत्र्यांनी आता उत्तम कामे करावीत. नागरिकांच्या अडचणी समजून मार्ग काढावा. महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भाजप करणार नाही. या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणीही काहीही करावे लागणार नाही, असेही ते म्हणाले.

काही राज्यात उलटेसुलटे राजकारण चालते. महाराष्ट्रात खूप प्रामाणिकपणाचे राजकारण व्हायचे, पण यावेळी काय झाले हे माहीत नाही. अवेळी पाऊस झाला, गारा पडल्या. त्या जशा अनाकलनीय आहे तसेच महाराष्ट्रातील राजकारण नागरिकांना अनाकलनीय आहे, असे पाटील म्हणाले.