
कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचे सरकार पडल्यानंतर भाजप सरकार स्थापन झालं आहे. आता पहिलं ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या ऑपरेशन कमळसाठी भाजप तयारीत असल्याचे कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मीडियामध्ये कर्नाटकातील या दुसऱ्या ऑपरेशनची तयारी सुरू आहे. जेडीएसमधून अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. तर डझनभर आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. दसऱ्यानंतर आणि हिवाळी अधिवेशनाच्या आधी हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे येडियुरप्पा सरकारला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वासही या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
224 जागा असलेल्या या विधानसभेत भाजपकडे सर्वाधिक 207 जागा आहेत. 17 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


























































