
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत बंडखोरांना स्थान नाही असे सांगितल्यानंतर आता भाजपने बंडखोरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी चार बंडखोरांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आज गोंदिया, पिंपरी-चिंचवड, दक्षिण नागपूर, मेळघाट, गडचिरोली, यवतमाळमधील आणखी 10 बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याबद्दल गोंदियातील कार्यकर्त्यांना आज भाजपकडून घरचा रस्ता दाखविण्यात आला.
भाऊराव उके, रतन वासनिक, छत्रपाल तुरकर, अमित बुद्धे यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. गोंदियातील विनोद अग्रवाल, पिंपरी-चिंचवडमधील सीमा सावळे, दक्षिण नागपूर सतीश होले, मेळघाट अशोक केदार, गडचिरोलीत गुलाब मडावी, यवतमाळच्या आर्णी मतदारसंघातून बंडखोरी केल्यामुळे राजू तोडसाम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली.
























































