
नगराध्यक्षपदाच्या लालसेने तीन पक्षांचा प्रवास करणारे डॉ. मारोती क्यातमवार यांच्या हाती शेवटी धुपाटणेच आले! काँग्रेसचा हात सोडून त्यांनी नगराध्यक्षपदाच्या लालसेपोटी मिंध्यांची सोबत केली. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मिंध्यांशी दगाबाजी करून ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. पण भाजपने ऐनवेळी सुषमा बोड्डेवार यांच्या नावाची घोषणा करून डॉ. क्यातमवारांना वाऱ्यावर सोडून दिले. बिच्चारे डॉ. क्यातमवार… आता अपक्ष लढणार आहेत !
वसमत शहरातील डॉ. मारोती क्यातमवार हे बडे प्रस्थ. अनेक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये काम करत होते. मिंध्यांचे आमदार संतोष बांगर यांनी त्यांना नगराध्यक्षपदाचे गाजर दाखवले. या आमिषाला बळी पडून डॉ. क्यातमवार यांनी गद्दारांची साथसंगत केली. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने डॉ. क्यातमवार यांना नगराध्यक्षपदाचे लाभार्थी बनवले.
क्यातमवारांच्या नावावर फुली
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे । मंत्री डॉ. अशोक उईके, परभणीच्या पालकमंत्री । मेघना बोर्डीकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या । बैठकीत डॉ. मारोती क्यातमवार यांच्या पत्नी सविता । क्यातमवार यांच्या नावावर फुली मारण्यात आली । आणि सुषमा शिवदास बोड्डेवार यांच्या नावावर । शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस, व्हाया। मिंधे गट ते भाजप असा प्रवास करून आलेल्या डॉ. क्यातमवार यांच्यावर शेवटी अपक्ष म्हणून लढण्याची वेळ आली आहे.
अपक्ष म्हणून लढणार : डॉ. क्यातमवार
वसमत नगराध्यक्षपदासाठी माझ्या पत्नी। सविता क्यातमवार यांच्या नामनिर्देशनपत्रासोबत । भाजपचा बी फॉर्म जोडण्यात आला आहे. भाजपने । ए फॉर्म दिलेल्या सुषमा बोड्डेवार यांनी माघार घेतली। तर भाजपचा उमेदवार असणार आहे, अन्यथा अपक्ष म्हणून नगराध्यक्ष निवडणूक लढविणार असल्याचे डॉ. मारोती क्यातमवार यांनी सांगितले,
मिंध्यांकडून पुन्हा भाजपला खिंडार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी । संतोष बांगर यांनी भाजपमधील अनेक एकमेकांना प्रवेश देऊ नका, पथ्य पाळा, असा दम दिल्यानंतर ४८ तास उलटत नाहीत तोच हिंगोलीतील मिंधे गटाचे निष्ठावंतांसह प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपचे उमेदवार भास्कर बांगर यांचा गुरुवारी पक्षप्रवेश घडवून आणला. त्यानंतर भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी बांगर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली. आज शुक्रवारी २४ तासही उलटले नाहीत, पुन्हा संतोष बांगर यांनी भाजप महिला जिल्हा चिटणीस ज्योती वाघमारे यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश करून घेतला. तसेच प्रभाग क्रमांक १७ अ मधील भाजपचे उमेदवार । गजानन सोनुळे यांनी उमेदवारी अर्ज मागे । घेऊन मिंधे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा ! दिला आहे.






























































