
भाजप आणि आरएसएस महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नावांचा आणि विचारसरणीचा द्वेष करतात, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. X वर येक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत. जयराम रमेश म्हणाले की, ही नावे वगळून भाजप नवीन हिंदुस्थानची निर्मिती करू शकत नाही.
जयराम रमेश म्हणाले आहेत की, “गांधी, आंबेडकर आणि नेहरूंबद्दल भाजपचा द्वेष वेळोवेळी समोर येत आहे.” भाजपवर आरोप करताना जयराम यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने संसदेत केलेल्या विधानाचा हवाला दिला. गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाने राज्यसभेत ७५ वर्षांच्या हिंदुस्थानच्या संविधानाच्या गौरवशाली प्रवासावर दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना बाबासाहेबांचा अपमान केला होता.
ते म्हणाले की, “गांधी-आंबेडकर-नेहरू यांच्या सामायिक वारशावर उभी असलेली आपली लोकशाही आणि संवैधानिक परंपरा भाजपा-आरएसएस हळूहळू खिळखिळी करू इच्छितात. पण त्यांची सर्वात मोठी विडंबना ही आहे की, त्यांनी त्यांना कितीही मिटवण्याचा, कमी करण्याचा किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी, हिंदुस्थानचा आत्मा गांधी, नेहरू आणि आंबेडकरांपासून वेगळा करता येणार नाही. ही नावे काढून टाकून एक नवीन भारत निर्माण करता येणार नाही. कारण ही लोकशाही, हे संविधान आणि हा देश याच वारशावर आधारित आहे.”
गांधी, आंबेडकर और नेहरू के नाम, उनकी विचारधारा और उनके नाम लेने वालों से चिढ़ और नफ़रत-भाजपा-आरएसएस की विचारधारा का केंद्रीय तत्व है। और यह चिढ़ और नफ़रत समय-समय पर सामने आती रहती है।
ठीक एक साल पहले केंद्रीय गृह मंत्री भरी संसद में बाबा साहेब आंबेडकर के प्रति अपनी घृणित सोच… pic.twitter.com/G7e4QmNXPL
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 17, 2025



























































