भाजपचे अकरापैकी सहा उमेदवार आयात, विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अकरा जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आज अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात सहा जण इतर पक्षांतून आयात केलेले नेते आहेत. नुकताच भाजप प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरे यांना नगरमधून पक्षाने संधी दिली आहे.

वर्धा – अरुण लखानी, भंडारा गोंदिया – अविनाश ब्राम्हणकर, अमरावती – प्रवीण पोटे, सांगली सातारा – धैर्यशील कदम, सोलापूर – राजेंद्र राऊत, अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे, संभाजीनगर – सुहास शिरसाट, नांदेड – अमर राजूरकर, धाराशीव लातूर – बसवराज पाटील, जळगांव – नंदकिशोर महाजन, नागपूर – राजीव पोतदार