भाजप प्रवक्ता संबित पात्रा रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोनाची लक्षणे आढळल्याने केले होते दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ट्विटरवर खुद्द पात्रा यांनी ही माहिती दिली आहे. 28 मे रोजी त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संबित पात्रा यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. म्हणून त्यांना गुरूग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. ट्विटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. पात्रा म्हणाले की तुमच्या आशिर्वादामुळे मी ठीक झालो आहे आणि घरी आलो आहे. माझी तब्येत पूर्ण सुधरायला अजून वेळ लागेल लोकांनी दिलेल्या आशिर्वादासाठी पात्रा यांनी आभार मानले आहे.

जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा व्यवसायाने सर्जन आहेत. पात्रा यांनी ओडिशाच्या हिंदू राव रुग्णाल्यात कामही केले आहे. 2019 साली त्यांनी पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. परंतु बिजेडी उमेदवारासमोर त्यांचा पराभव झाला होता.