पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, सात घरांना लावली आग

535

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात पाच घरांना लक्ष्य केले गेले, नंतर त्यांना आगही लावण्यात आली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणार आणली.

मिळलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी एका तृणमूल काँग्रेस नेत्याचा मृतदेह आणण्यात आला. 14 फेब्रुवारी रोजी धारधार हत्याराने त्यांचा खून करण्यात आला होता. भाजपनेच त्यांच खून केल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे. त्यांचा मृतदेह गावात आणल्यानंतर ही हाणामारी झाली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाज्प कार्यकर्त्यांच्या सात घरांची तोडफोड करून आग लावली असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणत पोलीस असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या