भाजपला संविधान, आरक्षण संपवायचेय! खासदार डॉ. फौजिया खान यांचा निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील भाजप सरकारला संविधान संपुष्टात आणायचे आहे. शासकीय नोकऱया कंत्राटी पद्धतीने भरून आरक्षणाच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रकादी काँग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान यांनी मिंधे सरकारवर आज रविवारी हल्लाबोल केला.

कंत्राटी भरती तरुणांना बेरोजगार करणारी असल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून लवकरच बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पत्रपरिषदेत दिला.

महिला आरक्षण विधेयक बिल म्हणजे पोस्ट डेटेड चेकसारखे आहे. कारण त्याची अंमलबजावणी 2029नंतर होणार आहे, असेही फौजिया खान म्हणाल्या.