झारखंडमध्ये भाजपला धक्का; गुजरातमध्ये भाजपचे शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुजरातमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शतकही गाठता आले नाही. आज मात्र गुजरातमधील जसदण विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने पक्षाने आता विधानसभेत शतक गाठले आहे. मात्र हिंदी पट्टय़ातील झारखंडमध्ये कोलेबिरामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. येथून काँग्रेसने बाजी मारली आहे.

कोलबिरामध्ये भाजपचे बसंत सोरेग आणि काँग्रेसचे विस्कल कोन्गडी यांच्यात मुख्य लढत होती. झारखंड पार्टीचे मेनन एक्का हेही येथून उभे होते. गुजरातमध्ये जसदण विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे कुंवरजी बावलिया हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अवसर नाकिया यांचा पराभव केला. कुंवरजी हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार होते.