
सामना प्रतिनिधी । नांदेड
लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने १३ तेरा काँग्रेसने ४ जागांवर विजयी मिळविला. भाजपने या नगरपालिकेत बहुमत मिळविले असून, नगराध्यक्षपदी गजानन सूर्यवंशी यांनी मोठ्या फरकाने काँग्रेस उमेदवाराला पराभूत करुन जोरदार विजयी मिळविला.
लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची निवड जनतेतून थेट झाली. लोहेकरांनी भाजपकडे कौल दिल्याचे निकालानंतर चित्र स्पष्ट झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपच्या गजानन सुर्यवंशी यांनी काँग्रेसचे सोनू यांचा 3 हजार ६९६ मतांनी पराभव केला.
संबंध जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लोहा नगर परिषदेवर आज भाजपचे कमळ फुलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या सभा घेऊन आपले मत मांडले होते. आज निकालानंतर भाजपकडे १३ तर काँग्रेसला ४ जागेवर समाधान मानावे लागले.
आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.
- प्रभाग क्र.१ अ मधून काँग्रेसच्या ज्योती चव्हाण-६५३ तर
- १ ब मधून दत्ता वाले यांना ४१८ मते मिळाली.
- प्रभाग क्र. २ अ मधून काँग्रेसच्या वर्षा चव्हाण यांना ८६३ मते पडली.
- प्रभाग क्र.२ ब अनुसूचित जाती मधून भाजपचे छत्रपती धुतमल हे १०३८ मतांनी विजयी झाले. प्रभाग क्र.३ अ मधून भाजपच्या राहिबाई खिल्लारे ८३५ मते घेऊन विजयी झाल्या.
- प्रभाग क्र.३ ब सर्वसाधारणमधून काँग्रेसचे पंचशिल कांबळे यांना ७४३ मते पडली. प्रभाग क्र.४ अ मधून काँग्रेसच्या शारदाबाई निर्मले या ७३२ मते घेऊन विजयी झाल्या.
- प्रभाग क्र.४ ब सर्वसाधारण गटातून बालाजी व्यंकटी शेळके यांनी ६४३ मते घेऊन विजयश्री खेचून आणली.
- प्रभाग क्र.५ अ महिलेचा मागासप्रवर्ग यामधून भाजपच्या चंद्रकला येळगे या १००६ मते घेऊन विजयी झाल्या.
- प्रभाग क्र.५ ब सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपचे केशव चव्हाण यांनी १३७७ मते घेऊन विजयी झाले.
- प्रभाग क्र.६ अ मागासप्रवर्ग गोदावरी सूर्यवंशी २४३२ मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
- प्रभाग क्र.६ ब शेख मैनतबी हबीब २०२४ मते घेवून विजयी झाल्या.
- प्रभाग क्र.६ क सर्वसाधारण गटातून भाजपचे संदीप दमकोंडवार हे २०५७ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग क्र.७ अ मधून भाजपचे अनुसया सदाशिव येलरवाड या १०३९ मते घेऊन विजयी झाल्या. तर प्रभगा क्र.७ ब मध्ये भाजपचे शरद पवार हे ९२२ मते घेवून विजयी झाले.
- प्रभाग क्र.८ अ मध्ये सर्वसाधारणातून गटातून अनुसया रोहिदास चव्हाण यांना ९५५ मते पडली
- तर भाजपच्या कल्पना चव्हाण या १०४० मतांनी विजयी झाल्या.
- प्रभाग क्र.८ ब मध्ये भाजपचे करीम मुजावर शेख हे १०२७ मते घेवून विजयी झाले. विजयी उमेदवारांची लोह्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
दोन उमेदवार आणि त्यांच्या पत्नीही विजयी
भाजपचे विजयी झालेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी या प्रभाग क्र.६ मधून भाजपकडून विजयी झाल्या. तर प्रभाग क्र.५ ब मधील भाजपचे केशव मुकदम हे विजयी झाले तर त्यांच्या पत्नी प्रभाग क्र.८ च्या भाजप उमेदवार कल्पना चव्हाण याही विजयी झाल्या आहेत. नगरपालिकेत पहिल्यांदाच दोन उमेदवार सपत्नीक निवडून आल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.एस.बोरगावकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर, अशोक मोकले, वाळूदकर यांनी काम पाहिले. मतमोजणी दरम्यान साडेसातशे पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
२०१३ साली झालेल्या निवडणुकीत मनसेने ९ जागा तर काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळविला होता. यानंतर मनसेच्या सर्व नगरसेवकांनी वर्षभरानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्याने खासदार तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना जबरदस्त धक्का बसला आहे.


























































