
पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूत मोठा पराभव होत असताना आसाममध्ये मात्र भाजपला दुसऱयांदा सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला 77 जागा मिळाल्या आहेत.
आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ या दोन आघाडय़ांमध्ये लढत झाली. ‘एनडीए’त भाजपला 60, आसाम गण परिषदला (एजीपी) 09 आणि ‘यूपीपीएल’ला 06 जागा मिळाल्या. 126 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता आहे. ‘एनडीए’कडे 77 जागा आहेत. त्यामुळे भाजपचे सर्बानंद सोनोवाल दुसऱयांदा मुख्यमंत्री होतील. ‘यूपीए’मध्ये काँग्रेसला 30, ‘एआययूडीएफ’ला 16 आणि बीपीएफला 03 जागा मिळाल्या. ‘यूपीए’चे संख्याबळ 50 झाले आहे.
पुद्दुचेरीत ‘एनडीए’
नवी दिल्ली – पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात ‘एनडीए’ आणि ‘यूपीए’मध्ये चुरस पाहायला मिळाली. ‘एनडीए’ला 16, ‘युपीए’ला 08 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 16 ही मॅजिक फिगर आहे. 06 अपक्ष निवडून आले आहेत.
पुद्दुचेरी विधानसभेचे अवघे 30 संख्याबळ आहे. माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ने निवडणूक लढविली. यात रंगास्वामी यांच्या ‘एआयएनआरसी’ पक्षाला 10, भाजपला 6 जागा मिळाल्या. अण्णा द्रमुकला खाते उघडता आले नाही.
‘यूपीए’ला 10 जागांवर विजय मिळाला. त्यात द्रमुकला 6, काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. भाकपचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.
बहुमतासाठी 16 संख्याबळ आवश्यक आहे. 6 अपक्ष निवडून आले आहेत. अपक्षांच्या मदतीने पुद्दुचेरीत ‘एनडीए’चे सरकार येईल.

























































