
एका आदिवासी मनोरुग्णावर लघुशंका करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला मध्य प्रदेशच्या सिधी जिल्हा पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. प्रवेश शुक्ला याने मद्यधुंद अवस्थेत या आदिवासीवर लघुशंका केल्याचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा तरुण भाजप कार्यकर्ता असल्याचे उघड झाल्यावर इतरांना धडा मिळेल अशी कठोरात कठोर शिक्षा या तरुणाला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटले आहे.



























































