पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमधील हिंसाचार सुरूच असून शनिवारी हुगळी येथे एका भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. काशिनाथ घोष असे त्या भाजप कार्यकर्त्याचे नाव असून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्याची त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

काशिनाथ घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते लालचंद बाघ यांच्या हत्येतील आरोप होता. दोन दिवसांपूर्वी काशिनाथ घोष हे अचानक बेपत्ता झाले. अखेर शनिवारी त्यांचा मृतदेह हुगळी येथील गोघाट गावातील नाल्यात आढळून आला.