मोदींच्या कॅशलेस इंडियाचा भाजप आमदारालाच फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ललितपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडियाचा फटका भाजपच्याच एका आमदाराला बसला आहे. उत्तर प्रदेशमधील ललितपूरचे हे आमदार असून रामरतन कुशवाहा असे त्यांचे नाव आहे. एका अज्ञाताने त्यांना फोन केला व एटीएम कार्ड व ओटीपी क्रमांक विचारला. फोन करणारी व्यक्ती बँकेचा कर्मचारी आहे असे समजून कुशवाह यांनीदेखील त्याला ओटीपी क्रमांक सांगितला. त्यानंतर भामट्याने त्यांच्या अकाऊंटमधले सगळे पैसे लंपास केले. विशेष म्हणजे कुशवाह यांच्या बँकेत फक्त ५ हजार रुपयेच होते. तेही भामट्याने काढले. दरम्यान, या घटनेनंतर कुशवाह यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

बँकेचे कर्मचारी असल्याचा बनाव करून अनेकजण लोकांना लुबाडत असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे येत असतात. पण काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार कुशवाह यांनी देखील त्यांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. एका अज्ञाताने त्यांना फोन केला होता. आपण बँक कर्मचारी असून खात्याचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमचा एटीएम कार्डवरील क्रमांक हवा आहे, असे सांगितले. त्यानंतर कुशवाह यांनी त्याला एटीएम कार्डचा क्रमांक सांगितला व त्यानंतर ओटीपी क्रमांकही सांगितला. कुशवाह यांच्या खात्यातून पाच हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला. नंतर लगेचच पुन्हा त्या व्यक्तीने कुशवाह यांना फोन केला आणि दुसऱ्यांदा ओटीपी क्रमांक सांगण्यास सांगितले. पण ५ हजार रुपये बँकेतून काढल्याचा मेसेज आल्याने कुशवाह यांना संशय आला व त्यांनी संबंधित व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगण्यास नकार दिला. त्यानंतर कुशवाह यांनी पोलिसांत याबद्दल तक्रार केली.

summery…bjp mla looted by bank hecker