बीकेसी चुनाभट्टी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीकेसी ते चुनाभट्टी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपुलाची लांबी ही दीड कि.मी असून रुंदी 17 मीटर इतकी आहे आहे. हा उड्डाणपूल चारपदरी आहे. या पुलामुळे ठाणे, नाशिक आणि पनवेल-पुण्याकडे जाणार्‍या वाहतुकीस कोंडी होणार नाही. तसेच या पुलामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरीलही वाहतूक कमी होणार असल्याची माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

पुलाची काही कामे बाकी असल्यामुळे एमएमआरडीएने हा पुल खुला केला नव्हता. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटवरून हा पुल वाहतुकीसाठी खुला असल्याचे जाहीर केले आहे.