बनावट सोने देऊन केली फसवणूक

खरे सोने घेऊन बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन सोने व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अखेर बीकेसी पोलिसांनी अटक केली. सौमित्र मृत्युंजय पान असे त्याचे नाव आहे. दोन जण फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. बीकेसी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सौमित्रला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या चौकशीत दोघांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.