
सामना ऑनलाईन । नांदेड
नांदेडमध्ये दुर्मिळ आणि विषारी असलेला ब्लॅक कोब्रा जातीचा साप आढळला आहे. शनिवारी रात्री नांदेडच्या एमआयडीसी भागातील एका वृत्तपत्राच्या कार्यालयात हा अत्यंत विषारी असा साप आढळला. सापाच्या फुत्कारांनी येथील कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. भयभीत कर्मचाऱ्यांनी यावेळी गणेश भोसले आणि विक्रम सारंग सर्पमित्रांना सापाला पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले.. दोघांनी अतिशय सुरक्षितपणे या सापाला जिवंत पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडून दिले आहे. या सापाच्या सूटकेनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
























































