Video – चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयावरून तिघांना मारहाण, पाच जणांना अटक

चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयावरून संशयावरून बहीण-भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली आहे.  नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावातील घटना असून अशोक कामठे, यशोदा कामठे  आणि इंदिराबाई कामठे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत.

मारहाण झालेले आणि करणारे सर्व आरोपी मिंडाळा गावातीलच रहिवासी आहेत. अशोक कामठे हा जादूटोणा करतो आणि त्यामुळेच मयुरी सडमाके  हिची तब्येत खराब राहते असा आरोप पाच जणांनी  यशोदा व इंदिराबाई यांना लाथा-बुक्क्यांनी तर अशोक याला बांबू आणि बॅटने मारहाण केली, या प्रकरणी नागभीड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.

जिवती तालुक्यातील वणी-खुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून 7 लोकांना मारहाणीची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या