नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट, इराणमधील लष्करी कारवाईशी संबंध?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल-अमेरिका आणि इराणध्ये मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू असताना नॉर्वेच्या राजधानीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील अमेरिकन दूतावासाजवळ हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे नॉर्वेजीयन पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र इराणमधील लष्करी कारवाईशी या स्फोटाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला अशी माहिती ओस्लो पोलिसांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. स्फोटाचे कारण किंवा त्यामागे कोण होते याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. मात्र घटनास्थळी मोठा आवाज झाल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हा स्फोट दूतावासाच्या कॉन्सुलर विभागाच्या प्रवेशद्वारावर झाल्याची माहिती पोलीस अधिकारी मायकेल डेल्मर यांनी दिली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास आम्हाला स्फोटाची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही काही वेळातच पोहोचलो आणि अमेरिकन दूतावासात स्फोट झाल्याची पुष्टी केली, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या स्फोटात किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

दूतावासाजवळील रहिवाशांनी मोठा स्फोट झाल्याचे सांगितले आहे. एडवर्ड (वय – 16) या मुलाने माध्यमांशी बोलताना, आपण टीव्ही पाहत असताना मोठ्या स्फोटाचा आवाज आल्याचे सांगितले. मला आणि माझ्या आईला प्रथम वाटले की आवज आमच्या घरातून येत आहे, म्हणून आम्ही थोडे आजूबाजूला पाहिले, परंतु नंतर आम्हाला खिडकीबाहेर चमकणारे दिवे आणि भरपूर पोलीस दिसले. घटनास्थळी पोलीस, डॉक स्क्वॉड, ड्रोन, स्वयंचलित शस्त्रे आणि हेलिकॉप्टर असलेले पोलीस होते, असेही त्याने सांगितले.

Iran Israel War – कुवैतने तेल उत्पादनात कपात केली; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारचा प्लान काय?

दरम्यान, इराणमधील अमेरिकन लष्करी कारवायांमुळे मध्य पूर्वेतील अमेरिकन दूतावासांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि तेहरानने औद्योगिक आणि राजनैतिक लक्ष्यांवर प्रत्युत्तर दिल्याने अनेकांना हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. ओस्लोमधील दूतावासाजवळील घटनेचा संघर्षाशी संबंध आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

Iran Israel War – इराणला मोठं सरप्राईज देणार; व्हिडीओ शेअर करत नेतन्याहू यांचा बडा धमाका करण्याचा इशारा