अंधांसाठी बीपीए क्रिकेट स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधजन मंडळ मुंबईच्या (ब्लाईंड पर्सन्स असोसिएशन-बीपीए) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, 25 मार्चला अंधांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चेंबूरमधील बीपीसीएल स्पोर्टस् क्लब मैदान, आर. सी. मार्ग, माहुल रोड, एलपीजी गेटसमोर सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आले आहे. एकदिवसीय मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड या जिह्यातील नामवंत खेळाडू भाग घेणार आहेत. उपहारापूर्वी दोन सामने खेळवले जाणार असून त्यातील विजेत्या संघांचा अंतिम सामना उपहारानंतर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 4.30 वाजता पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. विजेत्या संघांना आणि खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिके आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे.