
सामना प्रतिनिधी । मालवण
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना मालवण तालुका व युवासेना सिंधुदुर्ग यांच्या वतीने मंगळवारी मालवण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित या शिबिरात जिल्हा रक्तपेढीच्या आवश्यक क्षमतेनुसार २६ बॅग रक्त संकलित करण्यात आले, अशी माहिती उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर यांनी दिली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, दुलाजी परब, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुका प्रमुख आतु फर्नांडिस, दर्शन म्हाडगूत, शहर प्रमुख तपस्वी मयेकर, उपशहर प्रमुख अक्षय रेवंडकर, उपशहर प्रमुख गौरव वेर्लेकर, भार्गव खराडे, चंद्रकांत खोबरेकर, शाखा प्रमुख महेश मेस्त्री, नंदू गवंडी, संमेश परब, महेश शिरपुटे, प्रवीण लुडबे, किसन मांजरेकर, प्रवीण रेवंडकर, विभाग प्रमुख विजय पालव, शेखर रेवडेकर, दत्तगुरु पोईपकर, शाखा प्रमुख किशोर गांवकर, संचित देसाई, साहिल लवंदे, भावेश बटाव, संदीप पेडणेकर, वैभव खोबरेकर, राकेश (बंडू) गावडे, पलाश चव्हाण व अन्य उपस्थित होते.
जिल्हा रक्तपेढीचे डॉ रश्मी शुक्ल, किशोर नांदगावकर, हेमांगी रणदिवे, उल्हास राणे, नंदकुमार आडकर, नितीन गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले.






























































