संगीतमय व्हा!

43

गाण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला वाटते की आपण कधी ना कधी स्टुडिओमध्ये जाऊन गाणं रेकॉर्ड करावं… ठाणेकर गवय्यांना ही संधी मिळाली ती इथल्या ब्लू केसेट रेकार्ंडग स्टुडिओच्या निमित्ताने. या स्टुडिओचे निर्माते संस्थापक जिमी जॉय हे स्वतः गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या 14 वर्षांपासून ‘रॉक ऍण्ड रोल’, ‘जॅझ ऍण्ड ब्लुज’ असे कार्यक्रम केले आहेत. संगीतविषयक सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्यात असे त्यांना वाटत होते. त्यानुसार डॉक्युमेंटरी, फिल्म्स, टीव्ही, जाहिराती, वेब सिरीज आणि मीडिया असे संपूर्ण पॅकेज कलाकारांसाठी उपलब्ध आहे.

या स्टुडिओचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे संगीताच्या बाबतीतील सर्व सामग्री उपलब्ध असेल. स्टुडिओचे पाच भागात विभाजन करण्यात आलंय. ब्लॅक रूम, यलो रूम, ब्ल्यू रूम, रेड आणि ऑरेंज रूम.. हा स्टुडिओ आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणार आहे. यातील ब्ल्यू आणि यलो रूम्समध्ये ड्रम आणि गिटार एम्प्लिफायर ठेवण्यात येणार असून ते नव्या संगीतकारांना वेगवेगळ्या धाटणीचे संगीत निर्माण करण्यासाठी फायद्याचे ठरेल. नुकतेच उस्ताद गुलाम मुस्तफा खान आणि सलीम मर्चंड यांनी या स्टुडिओचे उदघाटन केले.

आपली प्रतिक्रिया द्या