महालक्ष्मी, मालाड, देवनारमध्ये प्राण्यांसाठी दहनभट्टी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका महालक्ष्मी, मालाड आणि देवनारमध्ये दहनभट्टी सुरू करणार आहे. ‘पीएनजी’वर आधारित असलेल्या या दहनभट्टय़ांमध्ये पाळीव प्राण्यांसह भटके पुत्रे व मांजरांवरही अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पालिका यासाठी 17 कोटी 80 लाख 29 हजार रुपये खर्च करणार असून येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

 मुंबईत वाढत्या शहरीकरणामुळे, वाहनांच्या धडकेने भटके पुत्रे-मांजरे जखमी अथवा मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी हे मृत प्राणी उघडय़ावर, गटारात, नदीनाल्यांत थेट टाकले जात असल्यामुळे रोगराई आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी, मालाड आणि देवनार या ठिकाणी प्राण्यांसाठी दहनभट्टय़ा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी महालक्ष्मी श्वान नियंत्रण कक्ष कार्यालयाच्या जागेमध्ये टाटा ट्रस्टमार्फत प्राण्यांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या ट्रस्टमार्फत तेथे प्राण्यांसाठी दहनभट्टीही उभारली जाणार आहे. या दहनभट्टीचे परिचलन पालिकेकडून करण्यात येईल.

प्राण्यांची आकडेवारी

प्राणी गणना 2012 नुसार संपूर्ण मुंबईत 33 हजार 572 पुत्रे आहेत. तसेच सन 2014 मध्ये पालिकेच्या वतीने केलेल्या गणनेनुसार मुंबईत 95 हजार 172 भटके पुत्रे आहेत. यापैकी सुमारे 70 हजारांहून अधिक पुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. हे निर्बीजीकरण ‘ऑनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्रॅम’अंतर्गत करण्यात आले होते.

उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या मृत शरीराचे दहन करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा 1960 आणि प्राणी जनन नियंत्रण नियमावली 2001 अन्वये प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खासगी अंत्यसंस्कार पेंद्र आहे. ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवले जाते, तर महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट बोरिवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे लावली जाते.

अशा बनवणार दहनभट्टय़ा

पालिकेच्या मालाड येथील गुरांचा कोंडवाडा येथे ताशी 50 किलो व देवनार येथे प्रत्येक ताशी 500 किलो एवढय़ा क्षमतेच्या दहनभट्टय़ा बसवण्यात येणार आहेत. या दहनभट्टय़ांचा पुरवठा, उभारणी, चाचणी घेऊन बसवल्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीचे पंत्राट दिले जाणार आहे. यासाठी मे. अनिथा टेक्सका@ट  (इंडिया) पंपनीची निवड करण्यात आली आहे.  या दहनभट्टय़ा पर्यावरणपूरक असणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून आता महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर दहनभट्टय़ा उभारण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.